महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न सुरक्षा मोहिमेची अमेरिकेतील प्रतिष्ठित न्यूयॉर्क टाइम्सने दखल घेतली आहे. मुंबईतील नामांकित हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवर अस्वच्छता, किडींचा प्रादुर्भाव आणि कोल्ड-चेन उल्लंघनासह नियमभंग आढळल्याने नोटिसा, परवाने निलंबन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्यभर पसरलेल्या या मोहिमेमुळे अन्न सुरक्षेवर प्रशासनाची कडक भूमिका अधोरेखित झाली असून मुंबईच्या रेस्टॉरंट उद्योगावरील परिणामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे.
तुकाराम मुंढेंच्या एफडीए कारवायांची न्यूयॉर्क टाइम्सकडून दखल
Source: Max Maharashtra