भाजप युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर; २९ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

भाजप युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर; २९ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

भारतीय जनता पक्षाने सोमवारी युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करून २९ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी ही नियुक्ती जाहीर केली. सर्व पदाधिकाऱ्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असून नांदेडच्या २८ वर्षीय शंभवी साळे यांच्याकडे युवती प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. तरुणांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवून युवा संघटन बळकट करण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies