विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे तर शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिल्याने महायुतीतील तिढा कायम आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा शिवसेना लढवेल आणि चिवटे उमेदवार असतील, अशी भूमिका असल्याचे सांगितले. मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत आणखी चर्चा होईल.
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत तिढा कायम
Source: Prahaar