भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी विकसित भारत @2047 च्या प्रवासात मुंबईचे योगदान अग्रणी राहील असा विश्वास व्यक्त केला. भाजप मुंबईतर्फे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी 'मुंबई डेव्हलपमेंट टूर' आयोजित करण्यात आला होता. सिद्धिविनायक ते चर्चगेट मेट्रो, अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ प्रकल्प आणि कोस्टल रोडची पाहणी करून दौऱ्याचा समारोप वरळी प्रोमेनेड येथे झाला.
विकसित भारताच्या प्रवासात मुंबई अग्रणी राहील: आमदार साटम
Source: Prahaar