पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील ८० जणांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यात २९ शिकवणी व अभ्यासिका चालक आणि ५१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एस. एम. जोशी पूल, लोकमान्य टिळक चौक व शास्त्री रस्त्यावर परवानगी नाकारूनही आंदोलन सुरू असल्याने कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील MPSC आंदोलनातील ८० जणांना पोलिसांची नोटीस
Source: Lokshahi Marathi