खोपोलीतील एका रुग्णालयात ८ दिवसांच्या नवजात बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कावीळ झाल्याचे सांगून डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे बाळाच्या नाकातून रक्त आले आणि प्रकृती खालावली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. मृतदेह जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवर परस्परविरोधी गुन्हे दाखल असून पोलीस तपास करत आहेत.
खोपोलीत ८ दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर आरोप
Source: Jai Maharashtra News