नाशिकहून सुरू झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पायी मोर्चावर मुंबईत पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी २५ ऑक्टोबरला पुन्हा मुंबईत येण्याचा इशारा दिला असून, आश्रमशाळा व वसतिगृहांतील सुविधा, शिष्यवृत्ती आणि सुरक्षेसह मागण्यांवर ठोस निर्णयाची मागणी केली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचे मुंबईत आंदोलन, २५ ऑक्टोबरला पुन्हा येण्याचा इशारा
Source: Pudhari