बंगळुरूच्या विद्यारण्यपुरा भागातील 'माय सलून अँड स्पा'मध्ये ३ ऑक्टोबरच्या रात्री ४ महिला आणि २ पुरुषांनी घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली व बेकायदेशीर कामांचा आरोप करत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. स्पा मालक नयनाच्या तक्रारीनुसार, धमकीमुळे व्यवस्थापनाने १ लाख रुपये दिले, तरीही आरोपींनी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मागणी केली. विद्यारण्यपुरा पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
बंगळुरू स्पामध्ये ६ जणांचा राडा, ५ लाखांची खंडणी मागितली
Source: Asianet Marathi