महाराष्ट्रातील खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे 11 सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दुष्काळाबाबत चर्चा केल्यानंतर हा दौरा ठरला. पथकाचे नेतृत्व मुक्तानंद अग्रवाल करीत असून तीन गटांत विभागून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील भागांची पाहणी होणार आहे.
दुष्काळ आढाव्यासाठी केंद्रीय पथक 8 ते 11 ऑक्टोबरला महाराष्ट्रात
Source: Prahaar