मुंबईत ८-९ ऑक्टोबरला प्रोटोटाइप सायरनची चाचणी

मुंबईत ८-९ ऑक्टोबरला प्रोटोटाइप सायरनची चाचणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी दक्षिण मुंबईत नव्या 'प्रोटोटाइप सायरन' उपकरणाची प्रायोगिक चाचणी जाहीर केली आहे. फोर्ट परिसरातील जुने सचिवालय व क्रॉस मैदान येथील नागरी संरक्षण महाविद्यालय इमारतीजवळ हे सायरन टप्प्याटप्प्याने वाजवले जाईल. C-DOT ने हे तंत्रज्ञान विकसित केले असून आपत्तीच्या वेळी नागरिकांना वेळेवर इशारा देणे हा त्यामागचा उद्देश आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies