श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील झोपडपट्टीत बंद झोपडीत पौर्णिमेच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी पूजा करून खड्डा खोदल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. नारळ फोडणे, अगरबत्ती, गुलाल, हळद-कुंकू आदी साहित्य आढळले. धनप्राप्ती किंवा नरबळीच्या अंधश्रद्धेतून हे कृत्य झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
कुरणपूरला बंद झोपडीत पूजा करून खड्डा खोदल्याचा प्रकार उघडकीस
Source: Deshdoot