नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. मागील कुंभमेळ्यातील पायपीट टाळण्यासाठी पोलिसांनी वाहनतळ, वाहतूक मार्ग आणि स्नान घाट एकत्रितपणे नियोजित केले आहेत. भाविकांच्या आगमन मार्गानुसार वेगवेगळे घाट निश्चित करण्यात आले असून रामकुंड परिसर केवळ साधू-महंतांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक पोलिसांचे विशेष नियोजन
Source: Prahaar