पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले. अनेक मागण्या मान्य केल्याचे सांगत, संविधानात न बसणाऱ्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास चौकशी समितीत तुकाराम मुंढे आणि संदीपसिंह गिल यांचा समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असून जागा रिकामी करण्यास सांगितले आहे.
एमपीएससी आंदोलन: मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन, चौकशी समितीत मुंढे, गिल यांचा समावेश?
Source: Sarkarnama