मुलुंडमध्ये बांधकाम इमारतीच्या आवारात भीषण आग, ७ सिलिंडरचे स्फोट

मुलुंडमध्ये बांधकाम इमारतीच्या आवारात भीषण आग, ७ सिलिंडरचे स्फोट

मुंबईतील मुलुंड पूर्व भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील कामगारांच्या तात्पुरत्या निवार्याला गुरुवारी भीषण आग लागली. आगीने तिथे ठेवलेल्या सात गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचल्याने एकापाठोपाठ स्फोट झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून सर्व कामगार वेळेवर सुरक्षित बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies