नाशिक जिल्ह्यात मिशन सुधार योजनेअंतर्गत २ लाख ४० हजार शिधापत्रिका अपात्र ठरवण्यात आल्या असून, त्यापैकी १ लाख ३० हजारांवर कारवाई झाली आहे. दुष्काळात स्वस्त धान्य बंद झाल्याने बीपीएल, अंत्योदय व प्राधान्यक्रम लाभार्थ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. नव्याने कार्ड काढण्यास पाच ते सहा महिने लागू शकतात, तर काही एजंट जादा पैसे मागत असल्याची तक्रार आहे.
नाशिकमध्ये दुष्काळात २.४० लाख रेशनकार्ड रद्द
Source: Pudhari