दिल्लीत आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द

दिल्लीत आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द

जंतरमंतर येथील आंदोलनामुळे नवी दिल्ली व हजरत निजामुद्दीन स्थानकांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ९ ते १० ऑक्टोबरदरम्यान दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. मुंबईहून जाणाऱ्या दोन राजधानी गाड्यांचे वेळापत्रक पाच तासांनी पुढे ढकलले असून सहा लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. आनंद विहार, दिल्ली जंक्शन व सराय रोहिल्ला स्थानके मात्र खुली राहतील.

Source: Jai Maharashtra News

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies