राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी (ग्राऊंड ट्रुथिंग) व पीक नुकसानीच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, नाशिक, सातारा आणि सांगली या आठ जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे. यामुळे वगळलेल्या भागांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, केंद्रीय पथकही नुकसानीची पाहणी करून अहवाल तयार करत आहे.
दुष्काळ: १८ तालुक्यांत पडताळणी सर्वेक्षणास मंजुरी
Source: Agrowon