पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी उमेदवारी मागे घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपचे कौस्तुभ गावडे महायुतीचे उमेदवार राहण्याचा मार्ग मोकळा झाला. पुणे पदवीधर मतदारसंघातून बंडखोर भैय्या माने यांनीही माघार घेतली. मतदान 23 ऑक्टोबर 2026 रोजी, तर मतमोजणी 27 ऑक्टोबरला होणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाच्या चिवटेंची माघार
Source: Lokshahi Marathi