भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केली. अमित शाह यांच्या कोलकात्यातील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण' असे म्हटले. काँग्रेसच्या 'व्होट चोरी'च्या आरोपांना प्रत्युत्तर देत 'चोराच्या उलट्या बोंबा' असा टोला त्यांनी लगावला. यामुळे भाजप-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत.
काँग्रेसवर रविंद्र चव्हाण यांचा निशाणा
Source: Lokshahi Marathi