माजी आयपीएस अधिकारी व भाजप नेते भास्कर राव यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून यू-ट्यूबर ध्रुव राठी याच्या नागरिकत्व, व्हिसा व इमिग्रेशन स्थितीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. राठीकडे जर्मन नागरिकत्व असून त्याने बंगळुरूतील एसआयआरविरोधी निदर्शनात सहभाग घेतला होता, असे राव यांचे म्हणणे आहे. परदेशी नागरिकाला भारतातील राजकीय आंदोलनात सहभागी होण्यास परवानगी आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ध्रुव राठीच्या नागरिकत्वाची चौकशी करण्याची मागणी
Source: Sarkarnama