उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव 'नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा-जेवर' करण्यास मंजुरी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. दिल्ली-एनसीआरमधील इंदिरा गांधी विमानतळावरील ताण कमी करणे हा यामागील उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात वार्षिक १.२ कोटी प्रवाशांची क्षमता असून, भविष्यात ती ७ कोटींपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.
नोएडा विमानतळाचे नाव 'नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ'
Source: Lokshahi Marathi