पालघरमधील सूर्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित हनुमान नगर आणि चंद्रनगरमधील प्रकल्पग्रस्तांना तीन महिन्यांत सातबारे देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुमारे 50 वर्षे प्रलंबित जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मान्यता दिली असून, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पडताळणी करून सातबारे वितरित करण्याचे आदेश आहेत. फडणवीस यांनी तीन महिन्यांनंतर स्वतः आढावा घेण्याचे आश्वासन दिले.
सूर्या धरण प्रकल्पग्रस्तांना तीन महिन्यांत सातबारा
Source: Lokshahi Marathi