कल्याण-डोंबिवलीत थेट मुंबई लोकलसाठी बैठक

कल्याण-डोंबिवलीत थेट मुंबई लोकलसाठी बैठक

कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रवाशांच्या समस्यांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांच्यासोबत बैठक घेतली. डोंबिवली, दिवा आणि निळजे येथून गर्दीच्या वेळेत थेट मुंबईकडे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. प्रवाशांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन आणि लोकल विलंब यावरही चर्चा झाली. मात्र नवीन फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies