मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतरमंतरवर आंदोलन जाहीर केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मेट्रो, इंटरनेट व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या बंद करून आंदोलन दडपल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडीवर हुकूमशाहीचा आरोप करत १२ ऑक्टोबरला राज्यभर सह्यांची मोहीम व आंदोलनाचा इशारा दिला.
दिल्लीत आंदोलन दडपल्याचा आरोप; राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर निशाणा
Source: Deshdoot