दिल्लीतील जंतर-मंतर परिसरातील आंदोलनादरम्यान आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांवरही कारवाई झाली. आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच नेत्यांना ताब्यात घेऊन पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जंतर-मंतर परिसरातून १५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे.
जंतर-मंतरवर कारवाई; केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात
Source: Jai Maharashtra News