कल्याणमध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक नियंत्रणासाठी ७ प्रमुख मार्गांवर जड, अवजड, मल्टिएक्सल वाहने तसेच खाजगी व शासकीय बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दुर्गाडी किल्ला व दुर्गामाता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ या वेळेत हे निर्बंध लागू राहतील. पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
नवरात्रीसाठी कल्याणमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी
Source: Prahaar