अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १४ तालुक्यांमध्ये खरिप पिकांच्या पंचनाम्याचे सुमारे ७२.८८ टक्के काम पूर्ण झाले असून ९ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख ४६ हजार २४० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व १,६१० गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू असून संगमनेर, पारनेर व राहुरी तालुके आघाडीवर आहेत. उर्वरित पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना वेळेत भरपाई व विमा मिळावा, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
अहिल्यानगर: करपलेल्या खरिप पिकांचे ७३ टक्के पंचनामे पूर्ण
Source: Deshdoot