मुंबईतील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा १२ वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती मोजणी नकाशांवरील हरकतींची सुनावणी घेऊन तीन महिन्यांत शासनाला शिफारस अहवाल सादर करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
मुंबईतील सात कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण होणार
Source: Prahaar