तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोलापूर व तुळजापूर डेपोतून रोज 34 जादा बस चालवण्याचे नियोजन केले आहे, त्यात 12 वातानुकूलित बसींचा समावेश आहे. कोजागरी पौर्णिमेला परतीच्या प्रवासासाठी 155 बस ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान एसटी गाड्या इटकळमार्गे वळवण्यात येतील.
तुळजापूर नवरात्रासाठी एसटीच्या रोज 34 जादा बस
Source: Lokshahi Marathi