नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्रीला तूप, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीला साखर किंवा पंचामृत, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेला खीर, चौथ्या दिवशी कुष्मांडेला मालपोआ अर्पण केला जातो. पाचव्या दिवशी स्कंदमातेला केळी, सहाव्या दिवशी कात्यायनीला मध, सातव्या दिवशी काळरात्रीला गूळ, अष्टमीला महागौरीला नारळ आणि शेवटच्या दिवशी सिद्धीदात्रीला हलवा, चणे, पुरी व खीर अर्पण केली जाते.
नवरात्रीत नऊ दिवशी देवींना कोणता नैवेद्य?
Source: Prahaar