दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 6115 विमानात पॉवर बँकला आग लागल्याने रविवारी ते हैदराबादकडे वळवण्यात आले. केबिन क्रूने फायर एक्स्टिंग्विशरने आग आटोक्यात आणली आणि विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँड झाले. सर्व प्रवासी व क्रू सुखरूप असून प्रवाशांना चेन्नईला नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्ली-चेन्नई इंडिगो विमानात पॉवर बँकला आग; हैदराबादमध्ये सुरक्षित लँडिंग
Source: Asianet Marathi