धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंबई CSMT ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 01219/01220 आणि 01019/01020 या गाड्या धावतील. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, वर्धा यासह अनेक स्थानकांवर थांबतील. नागपूरच्या दीक्षाभूमीवर दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो अनुयायांना याचा फायदा होईल.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई-नागपूर विशेष रेल्वे
Source: Prahaar