राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे अहिल्यानगरमध्ये दुष्काळ दौऱ्यावर असून रोहित पवार नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. उसाला ४,५०० रुपये दराच्या मागणीसाठी राजू शेट्टींचे चक्का जाम आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू असून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांची प्रकृती स्थिर
Source: Lokshahi Marathi