दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली 5 हजार रुपयांची अग्रीम मदत आता खात्यांमध्ये जमा होऊ लागली असून आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे. पुढील दोन दिवसांत 95 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे; काही खात्यांतील तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीअंतर्गत आज 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार 764 कोटी रुपये जमा झाले.
दिवाळीपूर्वी 73 लाख शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत जमा
Source: Jai Maharashtra News