बोरीवली अतिक्रमण प्रकरणात आयुक्त भिडेंचे वेतन रोखले

बोरीवली अतिक्रमण प्रकरणात आयुक्त भिडेंचे वेतन रोखले

बोरीवली येथील नियोजित बस स्थानक प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश पाळले न गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याविरोधात अवमान नोटीस बजावली असून त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने मुदतवाढीची याचिका फेटाळून अधिकारी व अतिक्रमणकर्त्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला.

Source: Jai Maharashtra News

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies