बुलढाणा जिल्ह्यात पत्नीने बचत गटामार्फत घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचा अपमानास्पद शब्दांत अपमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात शिवराळ भाषेचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करू नये, असे आदेश असतानाही हा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
बुलढाण्यात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याचा अपमान
Source: Jai Maharashtra News