राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांनी यापुढे महत्त्वाचे निर्णय कोअर कमिटीशी विचारविनिमय करूनच घेण्याची ग्वाही दिली. अलीकडे झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता केल्याने नाराजी होती. बैठकीत या नियुक्त्या सहा महिने कायम ठेवण्याचे स्पष्ट झाले, मात्र तटकरे आणि पटेल यांच्या पदांबाबत संभ्रम कायम आहे.
कोअर कमिटीशी चर्चेशिवाय निर्णय नाही: पार्थ पवार
Source: Prahaar