उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाराणसीत 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव करण्यात आला. अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेतर्फे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 'संस्कृती संसद २०२६' कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत-महंतांच्या उपस्थितीत शिंदे यांना 'धर्मध्वजाधारक' ही उपाधीही देण्यात आली. सनातन धर्म सत्य, न्याय आणि मानवी मूल्यांवर आधारित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिंदेंना वाराणसीत 'सनातन मार्तंड' पुरस्कार
Source: Lokshahi Marathi