राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे उपस्थित होते; मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार गैरहजर होते. पक्षातील नाराजी आणि अधिकार संघर्षाचे हे संकेत असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची अमित शहांना भेट
Source: Deshdoot