केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत खतांचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे केळी संशोधन केंद्र, जळगावने सुचवले आहे. प्रत्येक झाडाला २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. ठिबक सिंचनातून ७५ टक्के खते द्यावीत, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीही करावी.
केळी पिकासाठी खत व्यवस्थापनाची शिफारस
Source: Agrowon