दिवाळी सणासाठी सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. यात 43 अन्न व्यवसायांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली असून सुमारे 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. जप्त मालाची किंमत 63 लाख 9 हजार रुपये असून खवा, मावा, पनीर, मिठाई, फरसाण, सुकामेवा आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. निकृष्ट दर्जा व अस्वच्छतेमुळे ही कारवाई झाली.
दिवाळीपूर्वी FDAची कारवाई; 43 परवाने निलंबित, 17,824 किलो अन्न जप्त
Source: Prahaar