ठाण्यातील मासुंदा तलावात शुक्रवारी रात्री ३२ वर्षीय रेश्मा खंदारे यांनी उडी मारली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या किरण घोडे आणि राजेंद्र नागरे यांनी बोटीने जाऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले. महिलेला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. नौपाडा पोलीस उडीच्या कारणाचा तपास करत आहेत.
मासुंदा तलावात उडी मारलेल्या महिलेचा जीव वाचला
Source: Prahaar