संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी बागडोगरा हवाई दल स्थानकाला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि मिठाईचे वाटप केले. जवानांच्या शौर्याचे आणि शिस्तीचे कौथन करताना त्यांनी ड्रोन, सायबर सुरक्षा आणि आत्मनिर्भर भारतांतर्गत संरक्षण उत्पादनांवर भर दिला. स्थानिक नागरिकांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राजनाथ सिंह यांनी बागडोगरा हवाई दल स्थानकावर जवानांसोबत दिवाळी साजरी केली
Source: Prahaar