लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाणे पश्चिमेतील उपवन तलाव व वर्तक नगर परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे पायलादेवी मंदिर चौकातून येऊरकडे जाणाऱ्या वाहनांना सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील. वागळे वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी लागू नाही.
ठाण्यात दिवाळी पहाटेसाठी काही मार्गांवर प्रवेश बंदी
Source: Prahaar