लंडनमध्ये 2013 मध्ये दम्याच्या झटक्याने मृत्यू झालेल्या 9 वर्षांच्या एला अडू-किस्सी-डेब्राह हिच्या मृत्यूला वायुप्रदूषण कारणीभूत असल्याचा निष्काल साऊथवॉर्क कोरोनर्स न्यायालयाने दिला. ब्रिटनमध्ये मृत्यूचे कारण म्हणून प्रदूषणाची नोंद होण्याची ही पहिलीच घटना ठरली. तिच्या घराजवळ नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले.
प्रदूषणामुळे 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; ऐतिहासिक निकाल
Source: BBC Marathi