संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळात संपला असून, विरोधकांनी जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, राम मंदिरातील दान चोरी आणि अमित शाह यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यांवर सरकारला घेरले. आता चौथ्या आठवड्यात घमासान होण्याचे संकेत आहेत. अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने खासदारांना तीन दिवस उपस्थित राहण्यासाठी थ्री लाईन व्हीप जारी केला आहे. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ; शहा-बिर्ला भेटीनंतर चर्चांना उधाण
Source: Sarkarnama