केंद्र सरकारने सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून देशभरातील सायबर पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीत तत्काळ ई-झिरो एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवण्यासाठी मनी रेस्टोरेशन मॉड्यूल (एमआरएम) आणि 1930 हेल्पलाइनचा वापर केला जाणार आहे.
सायबर गुन्ह्यांविरोधात केंद्राचा कृती आराखडा
Source: Deshdoot