विधिमंडळाच्या अंदाज समितीने अहिल्यानगर तालुक्यातील वारुळवाडी आणि कापूरवाडी शिवारातील गौण खनिज उत्खननाची पाहणी केली. उत्खननामुळे डोंगर पोखरल्याचे आणि प्रशासनाच्या कारवाईतील त्रुटींवर समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान २५ डंपरमधून गौण खनिज वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने समितीने जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःहून कारवाई करण्याचे निर्देश दिले.
कापूरवाडीतील गौण खनिज उत्खननावर अंदाज समिती संतप्त
Source: Agrowon