नवी दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील युवा शेतकरी मिथिलेश देसाई यांच्याशी सुमारे १०-१२ मिनिटे संवाद साधला. फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगावर चर्चा झाली. देसाई यांनी फणसाच्या सालीपासून बनवलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर मोदींना भेट दिले.
पंतप्रधान मोदींचा 'फणसकिंग' मिथिलेश देसाईशी संवाद
Source: Mumbai Tak