गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित शाळेचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
गडचिरोली सर्पदंश प्रकरण: आश्रमशाळेचा परवाना रद्द
Source: Prahaar